जळगाव : PUBG Game News :'पब्जी'मुळे पुन्हा एक बळी गेला आहे. बारावीमध्ये शिकणाऱ्या वीस वर्षीय तरुणीने 'पब्जी' खेळाच्या नादात आत्महत्या केली. (Suicide of a 20 year old girl in Jalgaon) आत्‍महत्‍या करण्यापूर्वी याबाबत तिने सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे पुढे पोलीस तपासात पुढे आले आहे. या आत्‍महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पब्जी या मोबाईलवरील खेळ खेळण्याच्या आमिषापोटी लहान मुलांसह तरुणाईलाही आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर असताना शहरातील एका 20 वर्षीय महावीद्यालयीन तरुणीवर पब्जी खेळाच्या मोहापायी आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आली. तिच्या खोलीत सुसाईड नोट आढळून आली आहे. आपल्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये, अशा आशयाचा मजकूर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, घरी कोणी नव्हते. यावेळी तरुणीने घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.


जामनेरातील नगारखाना येथील या तरुणीने रविवारी पब्जी खेळाच्या नादात एका स्टेपवर येऊन आत्महत्या केली. आपली तरुण मुलगी गेल्यामुळे आई- वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या वडिलांनी घर बांधायला घेतले आहे. त्यामुळे आपल्या नव्या घराच्या भींतींसाठी पाणी मारायला तिची आई तिकडे गेली होती. त्यामुळे घरी कोणी नव्हते.


तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे दाखल केले. मात्र, डॉ. हर्षल चांदा यांनी तिला मृत घोषित केले. तसेच मोबाईल स्वीच ऑफ असल्याने अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस यंत्रणा अधिक तपास करीत आहेत, अशी माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे यांनी दिली.