Ravindra Chavan : मुंबई-गोवा हायवेच्या कामावरुन राज्य सरकारवर टीका केली जात आहे. मात्र, आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी याबाबत थेट इशारा दिला आहे. एकदा रस्ता होऊन जाऊ दे... मग या रस्त्याच्या आड येणा-यांना धडा शिकवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. डोंबिवलीत आयोजित मुंबई गोवा महामार्गावरील आयोजीत चर्चासत्रात त्यांनी हा इशारा दिला. रत्नागिरीमधल्या एका कंत्राटदारालाही नाव न घेता रवींद्र चव्हाण यांनी इशारा दिलाय. तेव्हा हा कंत्राटदार कोण याचीही चर्चा आता सुरु झाली आहे. 


काय म्हणाले रवींद्र चव्हाण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी देशात कुठे हतबल झाले नाहीत. कोकणात हतबल का झाले अशी खंत व्यक्त केली.  कामात दिरंगाई का झाली याबाबत चव्हाण यांनी भाष्य केले. जो कोणी या रस्त्याच्या आड येईल त्याला सोडणार नाही. या रस्त्यावर जागा नाही किंवा तिथे हॉटेल बनवणार नाही. माझा कोकणवासीय तीळ तीळ करतोय. रत्नागिरी मधल्या एका कॉन्ट्रॅक्टरच्या घरी तीन वेळा गेलो.  नाव घेणार नाही पण त्याची औकात नाही. त्याला लोकांबद्दल आपुलकी नाही. पण या सगळ्यांना धडा शिकवणार. एकदा रस्ता होऊन जाऊ दे मग बघू ना कोण कोणी काय काय केले. मला पण तेवढीच खुजली आहे...मी पण कोकणातलाच आहे असा इशारा रविंद्र चव्हाण यांनी दिला. 


मुंबई गोवा महामार्गावर पर्यायी रस्ते तयार करणार


या चर्चासत्र कार्यक्रमात उपस्थित कोकणवासी यांनी मुंबई गोवा महामार्ग बाबत सूचना केल्या तर या सूचनाबाबत आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. तसेच मुंबई गोवा महामार्गात पर्यायी रस्ते देखील तयार असल्याचे यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. 12 वर्षाचा कालावधी उलटला तरी मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप होत आहे. मनसेने देखील या महामार्गाच्या कामावरून भाजपाला लक्ष केले. 


मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात मनसेची कोकण जागर पदयात्रा


कोकण जागर पदयात्रेतून मनसे नेते अमित ठाकरेंनी राज्य सरकारला इशारा दिलाय. आजची पदयात्रा शांततेत आहे मात्र पुढची आंदोलन शांततेत नसतील असा इशारा अमित ठाकरेंनी दिलाय. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात मनसेनं कोकण जागर पदयात्रा काढली, त्यापदयात्रेत अमित ठाकरेंनी हा इशारा दिलाय.