राज ठाकरे यांचे कार्टून पुण्यात लक्ष वेधतेय, चर्चा तर बुमरॅंगची !
Raj Thackeray`s cartoons in Pune : पुणेकरांनी चौकाचौकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray News) यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्राची होर्डिंग्ज लावली आहेत. अलका टॉकीज चौक, गुडलक चौक तसेच कोथरुडमधल्या करिष्मा चौक इथं हे निनावी होर्डिंग्ज लावण्यात आले आहे.
पुणे : Raj Thackeray's cartoons in Pune : पुणेकरांनी चौकाचौकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray News) यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्राची होर्डिंग्ज लावली आहेत. अलका टॉकीज चौक, गुडलक चौक तसेच कोथरुडमधल्या करिष्मा चौक इथं हे निनावी होर्डिंग्ज लावण्यात आले आहे.
'सोयीनुसार आणि सुपारीनुसार...'
पुण्यात नेहमी होर्डिंग्ज पाहायला मिळतात. सध्या राज ठाकरे यांनी राज्यात भोंग्यांचा मुद्दा उचलला आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यालाही हात घातला आहे. मनसेच्या या अजेंड्यावर राज्यातील अनेकांनी आरोप केले. तर काहींनी त्यांना समर्थनही दिले आहे. असे असताना आता पुणे शहरात लागलेल्या होर्डिंग्जची चर्चा रंगली आहे.
होर्डिंग्ज लिहिले आहे की, अशी वेळ कोणावरही येऊ नये. उद्धव साहेब ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आणि 'श्री राम मंदिर'ला विरोध करुन व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे यांना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदुत्व....
या होर्डिंग्जमध्ये राज ठाकरे यांनी स्वत:च काढलेले व्यंगचित्र दाखवण्यात आले असून अशी वेळ कोणावरही येऊ नये, असे लिहिण्यात आले आहे. हे होर्डिंग्ज कोणी लावले याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांनाच त्या दौऱ्यावर जाण्याची वेळ आली आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व, असे या होर्डिंग्जवर लिहिण्यात आले आहे.