`अंबाबाई मंदिर पुजारी नेमण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्यास गोंधळ`
अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंदर्भातलं आश्वासन येत्या १५ दिवसांत सरकारनं पूर्ण करावं. अन्यथा करवीर निवासिनी अंबाबाई पूजारी हटाव कृती समितीतर्फे आधी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या दारात आणि नंतर मंत्रालयासमोर अंबाबाईचा गोंधळ घातला जाईल, असा इशारा अंबाबाई भक्तांनी दिलाय.
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंदर्भातलं आश्वासन येत्या १५ दिवसांत सरकारनं पूर्ण करावं. अन्यथा करवीर निवासिनी अंबाबाई पूजारी हटाव कृती समितीतर्फे आधी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या दारात आणि नंतर मंत्रालयासमोर अंबाबाईचा गोंधळ घातला जाईल, असा इशारा अंबाबाई भक्तांनी दिलाय.
नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्याचा कायदा करुन घेतला जाईल असं अश्वासन, महसुलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलं होतं. मात्र चंद्रकांतदादा पाटील यांनी अश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे अंबाबाई पुजारी हटाव कृती समिती सदस्य आता चांगलेच अक्रमक झाले आहेत.