अमरावती :  student suicide in  Amravati  : धक्कादायक आणि चीड आणणारी बातमी. परीक्षा फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर काढून घेतला. या प्रकारानंतर विद्यार्थ्याने आत्महत्या केली. तसा आरोप कुटुंबीयांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परीक्षा फी भरली नाही म्हणून हिसकावून परीक्षेचा पेपर घेतला. वर्ष वाया जाणार या भीतीने आमच्या मुलाने आत्महत्या केली आहे, असा आरोप त्याच्या कुटुंबीयानी केला आहे. पेपर हिसकवल्याने विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नवा अनिकेत अशोक निरगुडवार आहे. हा धक्कादायक प्रकार वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजीमध्ये घडला आहे. बडनेरा पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी आक्रोश केला आहे. तसेच कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांनी मागणी केली आहे.


विद्यार्थ्यांने महाविद्यालयाची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर हिसकावल्याने अनिकेत निरगुडवार या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना माजी मंत्री वसुधा देशमुख यांच्या अमरावतीमधील वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी महाविद्यालयात घडली आहे. आपल्या मुलाने फी चे पैसे भरले नाही म्हणून त्याचा पेपर हिसकावल्याचा आरोप विद्यार्थ्यांचे वडील अशोक निरगुडवार यांनी केला आहे.


या घटनेमुळे पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी महाविद्यालयाविरोधात बडनेरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आत्महत्या करणारा विद्यार्थी हा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून तो वसुधा देशमुख यांच्या महाविद्यालयात बिटेकच्या अंतिम वर्षांचे शिक्षण घेत होता. दरम्यान विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करावी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे.