Pune Crime news : राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा चोरट्यांनी अंगडिया ऑफिसमधल्या कर्मचा-यांना बंदुकीचा धाक दाखवत तब्बल 28 लाख लुटल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मार्केटयार्ड परिसराध्ये भातीचं वातावरण निर्माण झालं आहे. (pune 28 lakh was looted by firing at an office in the market yard area of pune pune crime news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं? 
मार्केटयार्ड परिसरात पी.एम. अंगडिया यांचे कार्यालय आहे. ते कुरिअर (Courier) कार्यालय असल्याची माहिती आहे. शनिवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास पाच सहा आरोपी ऑफिसमध्ये आले. त्यांनी दारातून बंदुक दाखवली. त्यानंतर दुसऱ्या साथीदाराने कार्यालयात असलेल्या काचेवर गोळीबार करुन काच फोडली. आरोपी पैसे घेऊन पळून गेले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. 


पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी सुरू केली आणि सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलं आहे. मात्र ही घटना गंभीर आहे कारण भरदिवसा इतकी मोठी लुटमार होणं म्हणजे पोलिसांचा धाक राहिला नाही की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.