Pune Heavy Rain Updates: मुंबई, पुणे, रायगडसह राज्यभरात आज पावसाचा जोर वाढला आहे. रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकलला विलंब झाल्याने ऑफिसला जाणाऱ्यांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. दरम्यान पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. गुरुवारच्या पहाटे पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील अंडा भुर्जीचा स्टॉल आहे. जवळच्या नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने अंडा भुर्जीच्या स्टॉलवर काम करणारे तीन इसम अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  यानंतर त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारांती डॉक्टरांनी आज पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान त्यांना मयत घोषित केले आहे.


मयतांचा तपशील


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत व्यक्तींची नावे समोर आली आहेत. अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष 25) आणि आकाश विनायक माने (वय वर्ष 21) हे डेक्कन वाडीचे रहिवाशी आहेत. तर शिवा जिदबहादुर परिहार (वय वर्ष 18) हा नेपाळी कामगार आहे.


उजनी धरण क्षेत्र आणि पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण उद्या प्लसमध्ये येणार आहे. उजनी धरण व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे.


शाळांना सुट्टी 


उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड आंबेगाव पुणे शिरूर तालुक्याच्या सर्वच भागात रात्री पासून मुसळधार पाऊस कोसळतोय. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आज रेड अलर्ट दिल्याने पुणे जिल्ह्याधिकाय्राकडून आज खेड आंबेगाव जुन्नर तालुक्याच्या पश्चिम घाट माथ्यावरील शाळांना आज सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासांपासून सुरू आहे संततधार पाऊस आहे. डिंभे धरण परिसरात झाला 104 मिलिमीटर पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे अनेक नद्या नाल्यांना पुर आलाय. दरम्यान प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देणार आला आहे. 


गाड्यांचे नियमन


देहूरोड चिंचवड विभागात अतिवृष्टीमुळे पुणे विभागातील किमी 169 येथे सुरक्षा खबरदारी म्हणून खालील गाड्यांचे नियमन करण्यात आले आहे. सुरक्षित हालचाल पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी घटनास्थळी पोहोचत आहेत


22944 22944 – इंदूर - दौंड सुपरफास्ट एक्सप्रेस - देहूरोड 
22105 इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस- कामशेत
पुणे लोकल कामशेत
12127 पुणे इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस-  लोणावळा
18520 विशाखापट्टणम एक्सप्रेस- खंडाळा
11007- डेक्कन एक्सप्रेस


उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन 



पावसाचा जोर वाढल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आवाहन केले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे ट्वीट त्यांनी केले आहे.