पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे विभागाच्या एसटी ताफ्यातून 72 बस बंद होणार
Pune MSRTC Bus News Today: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 72 एसटी गाड्या बंद होणार
Pune MSRTC ST Bus: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. येत्या काही दिवसांत पुणे विभागाच्या एसटी ताफ्यातून 72 बस बंद होणार आहेत. त्यामुळं ऐन सणासुदीच्या काळात पुणेकरांची तारांबळ उडणार आहे. 29 तारखेला एसटीच्या ताफ्यातून 72 जुन्या बस स्क्रॅप करण्यात येणार आहेत.
पुढील आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत आहे. सणासुदीच्या काळात नागरिक बाप्पाच्या दर्शनासाठी नातेवाईंकाकडे जात असतात. तर, काही गावालादेखील जात असतात. त्यामुळं मोठ्या प्रमाणात बस सेवेची गरज असते. अशातच पुणे विभागाच्या 12 आगारांतर्गंत 72 जुन्या बस स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे एसटी विभागात सध्या 855 बस कार्यरत आहेत. त्यातील 64 बस या ई-बस आहेत. तर 72 बस आहेत त्यांचे आयुर्मान संपल्याने स्क्रॅप करण्यात येणार आहेत.
72 बस स्क्रॅप करण्याचे निजोजन प्रशासनाने 29 ऑगस्ट रोजी केली आहे. त्यामुळं आता पुणे विभागाच्या ताफ्यात आता 783 बस राहणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळं पुणे विभागातील प्रवाशांना आता बस तुटवडा भासवण्यासोबतच एसटी प्रवास करताना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे वाहतूक सेवेवर परिणाम होणार बस तुटवडा बरोबर एसटी प्रवाशांचा खोळंबा होणार आहे.
एकीकडे पुण्यातील 72 बस स्क्रॅप करण्याचे निजोजन असले तरी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील गणेश उत्सवाच्या आधी शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मार्ग मेट्रो सुरू होणार होता. मात्र मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी न आल्याने अजून काही काळ लागणार आहे. भुयारी मार्गावरील 95 टक्के काम पूर्ण झाले आहे त्यामुळे गणेशोत्सवात स्वारगेट ते शिवाजीनगर हा भुयारी मार्ग सुरू करण्यात येणार असल्याचा, दावा मेट्रोने केला होता. मात्र मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी न झाल्याने मंजुरी देण्यात आली नाही.