Pune Car Accident :  पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.  पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिला आहे. विशाल अग्रवाल याचा महाबळेश्वरमधील MPG क्लबचा बार सील करण्यात आला आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर ही कारवाई केली गेली. विशाल अग्रवालच्या साता-यातील बेकायदा हॉटेलबाबत तक्रारी आल्यानंतर, तिथला बार सील करण्यात आला आहे.
नियम धाब्यावर बसवून विशाल अग्रवालनं महाबळेश्वरमध्ये पंचतारांकीत हॉटेल उभारलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप समोर आला. नियम धाब्यावर बसवून विशाल अग्रवालनं महाबळेश्वरमध्ये पंचतारांकीत हॉटेल उभारलं. विशेष म्हणजे शासकीय जागेत हे हॉटेल उभारलंय. त्याचबरोबर नियम धाब्यावर बसवून हे फाईव्हस्टार दर्जाचं हॉटेल उभारल्यानं महाबळेश्वर नगरपालिकेत अनेक तक्रारी दाखल आल्या होत्या.  मात्र  कारवाई होत नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी केला होता. त्याचबरोबर विशाल अग्रवालने स्वत:च्या नावावर दाखवलेलं हे हॉटेल दुस-याला त्यानं भाडेतत्त्वावर दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.


विशाल अग्रवाल हा पुणे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा वडिल आहे. पुणे कार अपघात प्रकरणात पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अग्रवाल बाप लेकांपाठोपाठ आजोबालाही अटक करण्यात आली आहे. ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला धमकावल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.  सुरेंद्र आणि विशाल अग्रवालने धमकावून मुलाचा गुन्हा अंगावर घे अशी बळजबरी केल्याची तक्रार ड्रायव्हरने दिलीय...अपघात घडल्यानंतर सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवालने कारमध्ये डांबून घरी आणून फोन काढून घेत धमकावल्याचा गंभीर आरोप चालकाने केला होता. 


अल्पवयीन मुलाच्या आईची देखील चौकशी


कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईची देखील चौकशी करण्यात आलीये.. या प्रकरणात ड्रायव्हरला धमकी देऊन पुरावा नष्ट करणे तसेच ससून मधील डॉक्टरांना पैसे देऊन रक्त नमुने बदलण्यात आल्याचं निष्पन्न झालंय.. त्यावरून अल्पवयीन आरोपीचा वडील आणि आजोबा दोघांनाही  अटक करण्यात आलीये. या प्रकरणात मुलाच्या आईची काही भूमिका आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. त्यासाठी त्यांनी मुलाच्या आईला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा मोबाईल बंद असल्याचं उघडकीस आलं आहे.