Pune Shirur Accident Case : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.  पुण्यातील कल्याणी नगर परिसरात बिल्डरच्या मुलाने पोर्शे कारण दोघांना चिरडलं. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. आता पुण्यातील शिरुर तालुक्यातही असाच एक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीने मुलीने पिकअप चालवताना धडक दिली. यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिरुर तालुक्याच्या अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी चालवत होती. त्यावेळी तिच्या सोबत शेजारच्या सीटवर पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते. यावेळी तिने पिकअप भरधाव वेगात चालवून दुचाकीला समोरुन धडक दिली. ही धडक इतकी गंभीर होती की मालवाहू पिकअपने दुचाकीला 20 ते 30 फूट फरफटत नेले. 


या अपघातात दुचाकी चालक अरुण मेमाने यांचा जागीच मृत्यू झाला. तर महिंद्र बांडे हा जखमी झाला. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. 


पुण्यातील पोर्शे कार प्रकरण चर्चेत


दरम्यान पुण्याच्या कल्याणीनगरमधील अपघातानं सपूर्ण राज्य हादरलं आहे. मद्यपान करून बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणानं बाईकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला.  पुणे हिट अँड रन प्रकरणी अग्रवाल बाप लेकांपाठोपाठ आता आजोबालाही जेलमध्ये डांबण्यात आलं आहे. ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला धमकावल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दारुच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपाली सध्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आलंय. त्याचे वडील विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर आजोबा सुरेंद्रला आज पोलीस कोठडीत डांबण्यात आलं. त्यामुळे अग्रवाल कुटुंबियांच्या तीन पिढ्या आता जेलमध्ये आहेत.