Pune Accident News: मागील काही दिवसांपासून बस अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. अशातच आता पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव (Ambegaon School bus Accident) तालुक्यातील शाळेच्या बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. घोडेगाव येथे शाळेकरी मुलांची बस दरीत कोसळल्याची घटना घडली. (aaditya thackeray on supreme court hearing maharashtra political crisis)


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगाव (Muktai Prashala Pimpalgaon) येथील शाळेची ही बस होती. बस गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेलेली असताना हा अपघात झाला. वाहन चालकाचा ताबा सुटल्याने ही बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चालकाचा ताबा सुटल्याने बस 100 फुट खोल दरीत कोसळली. त्यावेळी 44 विद्यार्थी बसमधून प्रवास करत होते, तर बसमध्ये 3 शिक्षक देखील होते.


अपघातात 5 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर 2 शिक्षक देखील गंभीररित्या जखमी आहेत. तसेच ड्रायव्हरला देखील जबर मार लागला आहे. घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात तसेच मंचर उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. इतर विद्यार्थ्यांची तपासणी करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


दरम्यान, सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना दरीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी स्थानिकांच्या मदतीने मुलांना बाहेर काढून तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवले. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर उपचार मिळू शकले आहेत.


आणखी वाचा -


सत्तासंघर्षात आणखी एक ट्विस्ट, कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत