पुणे  : असं म्हणतात की शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये. कारण कोर्टात कोणतीच केस लवकर सोडवली जात नाही असं म्हटलं जातं किंवा ऐकलं असेल. कोर्टात तारीख पे तारीख मिळत राहाते आणि कोर्टाचे उंबरे झिजवण्यात अर्धा वेळ निघून जातो. मात्र या सगळ्याला बगल देत एका कोर्टानं तातडीनं गुन्हाची शिक्षा गुन्हेगाराला दिली आहे. या कोर्टाच्या निर्णयामुळे सर्वत्र कौतुक देखील होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओळखीचा फायदा घेऊन एक व्यक्ती घरात घुसला आणि विकृत चाळे करू लागला. महिलेच्या घरात घुसून मुलांसमोर अश्लील कृत्य आणि विनयभंग करण्याचं धाडस त्याने केलं. या प्रकरणी महिलेनं तातडीनं न्याय मागण्यासाठी पोलिसात धाव घेतली. तिने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं आपली यंत्रणा कामाला लावली.


पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपीला गंभीर बेड्या ठोकल्या. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं. अवघ्या 72 तासांत शिवाजीनगर कोर्टाकडून आरोपीला 18 महिने कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. 24 जानेवारी रोजी रात्री 10.30 च्या सुमारास पीडित महिलेच्या घरात एक व्यक्ती घुसला. त्याने अश्लील कृत्य करत महिलेचा विनयभंग केला. 


पीडितेनं पोलिसांमध्ये तातडीनं तक्रार दाखल करून न्याया मागितला. पोलिसांनी आपली पूर्ण टीम कामाला लावून 36 तासांत आरोपीला बेड्या ठोकून कोर्टात हजर केलं.  न्यायालयात वकील विजयसिंह जाधव यांनी मजबूत पुरावे सादर केले. त्यामुळे आरोपीला 72 तासांत शिक्षा मिळाली. आरोपी समीर जाधवला कलम 354 अन्वये 6 महिने, कलम 452 अन्वये 6 महिने, कलम 506 अन्वये 6 महिने अशी सक्त मजुरीसह 9 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.