Pune Airport To Start Pune-Bangkok Direct Flight :  पुणेकरांना थर्टी फस्ट बँकॉकमध्ये प्लान करण्याची संधी आहे. पुणे विमानतळावरून दुबई, सिंगापूरनंतर नवी विमान सेवा सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 20 डिसेंबर पासून  पुणे विमानतळावरून थेट बँकॉकसाठी विमानसेवा सुरु केली जाणार आहे. यामुळे ख्रिसमस, थर्टी फस्ट, न्यू इयर सेलिब्रेशन तसेच फॉरेन टूरचा प्लान करणाऱ्या पुणेकरांसाठी थेट परदेशात जाण्याची संधी आहे.  


हे देखील वाचा... मुंबई आणि पुण्याच्या मधोमध असलेलं जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ; अथांग समुद्र आणि बरचं काही...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याहून देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये आता वाढ झाली आहे. पुण्यातून बँकॉकसाठी नवी विमान सेवा सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.  20 डिसेंबरपासून पुणे बँकॉक विमानसेवा सुरु होणार आहे. विंटर शेड्युलमध्ये पुण्याहून बँकॉकसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. 


हे देखील वाचा... पश्चिम महाराष्ट्रातून ट्रॅव्हल्सच्या किंमतीत विमान प्रवास! गोव्याचं तिकीट फक्त  689 रुपये


पुण्यातून आधी स्पाईसजेटकडून सिंगापूर सेवा सुरु केली. यानंतर एअर इंडियाकडून (आधीची विस्तारा) दुबईसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली. यात आता बँकॉक विमानसेवेची भर पडली आहे. यामुळे पुणे शहर तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी हवाई मार्गाने थेट जोडले गेले आहे.  पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या पाचवर पोहोचली आहे. दुबई 2, बँकॉक 2 आणि सिंगापूर 1 अशी पाच उड्डाणे आहेत. 


पुण्यातून दुबईसाठीची विमान सेवा ही दररोज उपलब्ध आहे. पुण्यातून सायंकाळी 5.40 वाजता विमान दुबईला रात्री 10.10 वाजता पोहोचेल. दुबईतून हे विमान रात्री 12.15 मिनिटांनी सुटेल. पुण्यातून बँकॉकसाठी आठवड्यातून तीन दिवस बुधवारी, शुक्रवारी आणि शनिवारी थेट विमानसेवा सुरू असेल असे समजते. हे विमान पुण्यातून रात्री 11.10 ला टेक ऑफ घेईल. तर, बँकॉकवरून रात्री 1 वाजून 15 मिनिटांनी सुटेल.