पश्चिम महाराष्ट्रातून ट्रॅव्हल्सच्या किंमतीत विमान प्रवास! गोव्याचं तिकीट फक्त 689 रुपये

पश्चिम महाराष्ट्रातून मुंबई तसेच गोव्याला जायचा प्लान करणाऱ्यांसाठी एक गूड न्यूज आहे. प्रवाशांना  ट्रॅव्हल्सच्या किंमतीत विमान प्रवास करता येणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Nov 28, 2024, 09:15 PM IST
पश्चिम महाराष्ट्रातून ट्रॅव्हल्सच्या किंमतीत विमान प्रवास! गोव्याचं तिकीट फक्त  689 रुपये

Solapur Goa Fligh: पश्चिम महाराष्ट्रातून विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम महाराष्ट्रातीन प्रवाशांना आता ट्रॅव्हल्सच्या किंमतीत विमान प्रवास करता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर विमानतळावरुन  गोव्याचं तिकीट फक्त  689 रुपये असणार आहे. तर, मुंबईचे तिकीट 1488 इतके असले. 

 हे देखील वाचा... मुंबई आणि पुण्याच्या मधोमध असलेलं जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ; अथांग समुद्र आणि बरचं काही...

काही महिन्यांपूर्वीच सोलापूर विमानतळाचे उद्घाटन झाले.  सोलापूर ते पुणे विमानसेवा डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे. त्याआधीच  गोवा येथील फ्लाय 91 (Fly 91 ) या विमानसेवा (Airline) देणाऱ्या कंपनीने (Fly 91 Company) विमानसेवेचे संभाव्य दरपत्रक जाहीर केले आहे. सोलापूर विमानतळावरुन मुंबई आणि गोव्.याला उड्डाण घेणाऱ्या या विमान सेवेचे दर सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहेत. 

Fly 91 या Airline कंपनी बजेटमध्ये विमान प्रवास सेवा देण्यासाठी लोकप्रिय आहे. Fly 91 या Airline कंपनीने सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा या मार्गावरील संभाव्य दर प्रसिद्ध केले आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीचे दर हे ट्रॅव्हल्स इतके स्वस्त आहेत. प्रवासाच्या तीन ते चार महिने आधी बुकिंग केल्यास अत्यंत कमी पैशात दरात विमान प्रवास करता येणार आहे. आधीच बुकींग केले तर  सोलापूर ते गोवा तिकीट 689 रुपये तर सोलापूर ते मुंबई तिकिट 1488 रुपयांत उपलब्ध होईल. पश्चिम महाराष्ट्रातून मुंबई तसेच गोव्याला जायचा प्लान करत असणाऱ्यासांठी अगदी कमी दरात विमान प्रवास करता येणार आहे. 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More