बारामती :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे दिलखुलास वक्तव्य आपण नेहमी त्यांच्या भाषणात ऐकत असतो. असेच एक दिलखुलास वक्तव्य आज त्यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात केले. यावेळी त्यांनी टक्कल का पडल याचे मिश्किल भाषेत गुपीत सांगितले. 
 
 राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने बारामतीत जिजाऊ आणि बाल शिवरायांच्या  पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. 
 
 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि  त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उपस्थिती हा अनावरण सोहळा पार पडला..  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 नेमका का झाला किस्सा...


 या कार्यक्रमात अजित पवारांना फेटा बांधण्यात आला. त्यावेळी त्यांनी यावर मिश्किल टिप्पणी करत म्हटले.  सर्वांनी फेटा बांधला तेव्हा मी पण म्हटलं बांध बाबा मला फेटा बांध... आता केस पण राहिले नाही. बारामतीकरांसाठी काम करता करता माझे केस गेली आहेत... मी सुनेत्राला म्हणत असतो की बघ माझे केस तुझ्यामुळे गेले का बारामतीकरांसाठी काम करता करता गेले. 
 


अनुचित प्रकार घडू नये म्हणून शरद पवार पुढाकार घेतात... 


 बारामती तालुका मराठा सेवा संघ आणि जिजाऊ सेवा संघाच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात आला. भीमाकोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना समाजात काही अनुचित घटना घडल्यास कोण काय म्हणेल म्हणून कुणी पुढे येत नाही मात्र शरद पवार सर्वात आधी पुढे असतात याची त्यांनी आठवण करुन दिली. जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न सर्वानींच केला पाहिजे असंही पवार म्हणाले..