पुणे : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर देशासह राज्यभरात महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. रविवारी जनता कर्फ्यू घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. जिल्हा पातळीवरही जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार आणि आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभुमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दारुची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पर्शवभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  


पुणे शहरातील वाईन शॉप, बियर शॉपी, देशी दारु किरकोळ विक्री केंद्राचे व्यवहार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २० मार्च म्हणजेच आजपासून हे आदेश लागू करण्यात आले आहेत.


३१ मार्च पर्यंत ही मद्य विक्री केंद्र बंद ठेवण्याचे आदेश आहेत.


या आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमन, 1949,  त्या अंतर्गत असलेल्या कलम  आणि नियमांनुसार कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम-142 नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.


त्यामुळे कोरोनामुळे मिळालेल्या सुट्टीचा उपयोग दारु पिण्यासाठी करु इच्छिणाऱ्या तळीरामांचा मोठी पंचाईत झाली आहे.