पुणे : शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. विशेष करून धरण क्षेत्रात दमदार पाऊस होतोय. परिणामी पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढतोय. पुण्याला लागून असलेलं खडकवासला धरण तर दिवसांपूर्वीच भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याक्षणी धरणातून 5219 क्युसेक्स नं पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने मुठा नदीची पाणीपातळी वाढली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.


आजचा पाणीसाठा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खडकवासला 100 %
पानशेत 80.80 %
वरसगाव 66.79 %
आणि टेमघर 52.19 %


पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांत मिळून 21.07 टीएमसी म्हणजे 72.30 % पाणीसाठा झाला आहे. अर्थात गेल्या वर्षी ही चारही धरणं 100 टक्के भरली होती. यावर्षी त्यासाठी काहीशी वाट पाहावी लागत आहे.



त्याचप्रमाणे नाशिक दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे.  दारणा धरणातून 9 हजार 956 क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग झाला आहे.  ईगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दारणा धरण 92.13 टक्के भरलं आहे. तर नांदूरमध्यमेश्वर धरणातूनही 16 हजार 865 क्यूसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं आहे. मुकणे धरणाच्या पाणीपातळीतही मोठी वाढ