पुणे : अटक केलेल्या पाच संशयित बांगलादेशींनी मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचं आता उघड झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्सारउल बांगला टीम म्हणजेच ए  बी टी या संघटनेनं महाराष्ट्रात तीन शहरात जाळं पसरवलं होतं. ही दहशतवादी संघटनेनं पुणे, महाड आणि अंबरनाथमध्ये पाळमुळं रोवली असल्याचं आता पुढे आलंय.  
अन्सार उल बांगला टीम अर्थात ABT या दहशतवादी संघटनेवर 2016 मध्ये बांगलादेशमध्ये बंदी घालण्यात आलीय. ही संघटना अल कायदाशी संलग्न असून कोलकाता, मुंबई आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट होता.


पण यापैकी कुठलीही योजना पूर्ण होण्याआधीच एटीएसनं पाच जणांना अटक करून कट उधळून लावला.