पुणे : पुण्यात पार्किंगच्या वादातून चार जणांना जबर मारहाण करण्यात आली आहे. पुणे - नगर रस्त्यावरील खांदवेनगर परिसरात ही घटना घडली आहे. दगडफेक करत काठ्या, कोयते घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला. तसेच, पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना घडली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्किंग चालक विजय गायकवाड आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर २५ ते ३० गुडांनी सशस्त्र हल्ला केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. या मध्ये विजय गायकवाड यांचा हात फॅक्चर झाला असून डोक्याला मार लागला आहे. इतर पाच जणांचे हात पाय फॅक्चर झाले आहेत. 


जखमींवर वाघोलीतील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी 4 आरोपींना अटक केलीय. तर इतर आरोपीचा शोध सुरू आहे. सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.