पुणे : MNS warning : आता एक धक्कादायक बातमी. महिला कामगारांना त्रास देणाऱ्या कंपनीत मनसेने जोरदार दणका दिला आहे. वॉशरूमला (washroom) जाण्यासाठी चक्क लेटर लिहून घेण्याचा प्रकार उघड झाला आहे. हा कंपनीचा 'तालिबानी' फतवा (Taliban fatwa) असल्याची चर्चा सुरु होताच मनसेने (MNS) चांगलाच कंपनीला झटका दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील या इंजिनिअरिंग कंपनीत महिलांना त्रास देण्यात येत होता. महिलांना गलिच्छ वागणूक मिळत होती. याबाबत तक्रार मनसेकडे आल्यानंतर मनसेने मॅनेजरला जाब विचारला. वॉशरूमला जाण्यासाठी महिला कर्मचाऱ्याकडून लेटर लिहून घेण्याचा प्रकार पुण्यात घडला होता. 


या कंपनीच्या मॅनेजरला मनसे माथाडी कामगार अध्यक्ष नीलेश माझिरे यांनी जाब विचारला. मनसेने दणका दिल्यावर मॅनेजरने या गलिच्छ प्रकाराची कबुली दिली. पोंड पोलीस स्टेशनमध्ये महिला कर्मचारी कंपनीविरोधात तक्रार करणार आहेत. कंपन्यांमध्ये महिलांवर अन्याय झाल्यास मनसे स्टाईलने कंपन्यांनी उत्तर देणार असा इशारा देण्यात आला आहे. 


तेलाचा काळाबाजार, मनसेकडून भांडफोड


दरम्यान, वसईत एका अनधिकृत गाळ्यात  सुरू असलेला तेलाचा काळा धंद्या मनसेने उघड केला. नालासोपारा फाटा परिसरात उमर कंपाउंड इथे एका गाळ्यात नागरिकांच्या आरोग्याला घातक असलेल्या तेलाचं पॅकिंग केले जात होते. मनसेचे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह धाड टाकून याचा भांडफोड केला. या तेलाचा वसई-विरार सह पालघर परिसरात वेफर्स फरसाण बनवण्यासाठी वापर होत होता.