पुणे : पुणे महापालिकेवर पहिल्यांदाच झेंडा फडकावलेल्या भाजपमध्येच फुटीची चिन्हं आहेत. भाजपचे नगरसेवक तसंच पदाधिकार्यांना एक ४ पानी निनावी पत्र पाठवण्यात आलंय. त्यात पक्षातल्या अनेक जेष्ठ नेत्यांपासून स्थानिक नगरसेवकांवर टीका करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षामध्ये काकडे समर्थकांवर अन्याय सुरु असल्याची तक्रार करण्यात आलीय. विशेष म्हणजे हे पत्र महापलिकेतल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवक आणि पदाधिका-यांनाही पाठवण्यात आलंय. पत्रातल्या मजकुरावरून हे पत्र संजय काकडे समर्थकानं लिहिल्याचं वाटतंय. पत्रावर शिक्का मात्र दिल्लीचा आहे. त्यामुळे पत्र नेमकं कोणी लिहिलं याबद्दल संभ्रम आहे. 


महत्वाचं म्हणजे शहराशी संबंधित निर्णय प्रक्रियेत काकडे समर्थकांना डावलंलं गेल्यास काकडे समर्थक  ५५ नगरसेवक स्वतंत्र निर्णय घेण्यास समर्थ असतील असा गर्भीत इशाराही या पत्राद्वारे पक्षाला देण्यात आलाय.  या लेटरबॉम्बमुळे शहराच्या राजकारणात खळबळ उडालीय. सध्या पुणे भाजपमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं पडतोय.


२४ x ७ पाणीपुरवठा योजनेच्या निविंदावरून पक्षातली गटबाजी नुकतीच समोर आली होती. त्यातच पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पदाधिका-यांना बावळट संबोधून त्यांची लायकी काढली होती. ते प्रकरण शमत नाही तोच आता हा निनावी लेटरबॉम्ब पडलाय.