Pune Bopdev Ghat Crime: पुणे बोपदेव घाट परीसरात गुरुवारी मध्यरात्री 21 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकारानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. घाटाच्या मधोमध सामुहिक बलात्काराचे कृत्य आरोपींनी केले होते. यानंतर घाटाच्या वरच्या भागातून पळ काढला. अत्याचार करण्याआधी आरोपींनी गांजाचे सेवन केल्याची माहिती समोर येत आहे. यातील मुख्य आरोपी शोएब संदर्भात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पुणे बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी शोएब अख्तर उर्फ शोएब बाबू शेख यांची डीएनए चाचणी केली जाणारेय. शेख याचं रक्त, नखं, तसंच थुंकीचे नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. 


 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात अटक आरोपींकडून सखोल चौकशी आणि पुढल्या तपासासाठी 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


3 लग्न, 1 अफेयर


पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अख्तर शेख याचे धक्कादायक कारनामे पोलीस चौकशीत उघडकीस आलेत. अख्तर शेखनं आतापर्यंत 3 महिलांशी लग्न केल्याची माहिती उघडकीस आलीये.यातील दोन महिला नागपुरातील तर एक उत्तर प्रदेशातील आहे.याशीवाय आणखी एका तरुणीशीही त्याचे संबंध होते.. 


अत्याचार करण्यापूर्वी गांजाचं सेवन


बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार करण्यापूर्वी या आरोपीनं गांजाचं सेवन केल्याची प्राथमिक माहितीही समोर आलीये.. त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल होते.. दरम्यान त्याला कोर्टात हजर केलं असता 22 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये.


काय आहे प्रकरण?


पुणे बोपदेव घाट येथे एक तरुणी रात्रीच्या वेळेस आपल्या मित्रासोबत वॉकला गेली होती. दरम्यान तिथे आधीपासून दडी मारुन बसलेल्या 3 नराधमांची तिच्यावर वाईट नजर पडली. त्यांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला आणि बाईकवर बसून तिथून पळ काढला. तीन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर चोरीचे गुन्हे याआधी दाखल आहेत. तसेच त्यातील एकावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल आहे, अशी माहिती पुढे आली. पोलिसांनी या आरोपींचे स्केच जाहीर केले होते.


पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न


सामुहिक बलात्काराची घटना घडल्यावर आधी ते बोबदेव घाटाच्या वरच्या भागात गेले. यानंतर तिथे त्यांनी काही वेळ घालवला. पुढे त्याच रस्त्याने आरोपी घाट उतरले. पुढे ते कोंढवा भागात पोहोचले. आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी ते वेगवेगळ्या रस्त्यावरुन फिरु लागले. कुठल्याही सीसीटीव्हीमध्ये आपण सापडू नये यासाठी दिशाभुल करण्याचा प्रयत्न ते करत होते. दरम्यान एका इसमान त्यांना ट्रीपल सीट प्रवास करताना पाहिले होते. त्याने पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. या माहितीवरुन पोलिसांनी पुढील तपास केला. एकाला ताब्यात घेऊन  चौकशी करण्यात आली आणि या गुन्ह्याचा उलगडा होत गेला. आता मुख्य आरोपीच्या 2 साथीदारांकडेदेखील चौकशी सुरु आहे.