Swiggy Order Pune : पुणेकर नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असलेले पाहायला मिळतात. पुणेकर म्हणजे खडूस असं म्हणत अनेकवेळा त्यांना हिणवलं जातं. मात्र एका पुणेकराने दाखवून दिलं आहे की पुणेकरही मोठ्या मनाचे असतात. पुण्यातील एका कंपनीच्या बॉसने ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल 71 हजारांची Swiggy ला ऑर्डर मागवली. विशेष म्हणजे स्विगीवरील ही सर्वात मोठी दुसरी ऑर्डर ठरली आहे. (Pune boss  ordered 71 thousand worth of burgers and fries from Swiggy for his employees latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Swiggyने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका कंपनीतील अधिकाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 71 हजारांची ऑर्डर केली आहे. ऑर्डमध्ये बर्गर आणि फ्राईजचा अधिक समावेश आहे. मोठ्या रकमेची ऑर्डर देणारा पुण्याचा बॉस देशातील दुसरा ग्राहक ठरला आहे. याआधी बंगळुरूमधील एका व्यक्तीने स्विगीवर देशातील सर्वाधिक रकमेची मोठी ऑर्डर केली होती. 


दिवाळीच्यावेळी बंगळुरूच्या व्यक्तिने 75,387 रूपयांची स्विगीची आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर मागावली होती. आता पुण्याचा बॉस हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक रकमेची ऑर्डर मागवणारा ग्राहक ठरला आहे. स्विगीने यंदाच्या वर्षातील सर्वाधिक ऑर्डर केला गेलेला पदार्थ, या कंपनीला यंदाच्या वर्षात किती नफा मिळवला सर्व माहिती त्यासोबतच देशतील सर्वाधिक रकमेची ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांची यादीही स्विगीने जाहीर केली आहे. 


दरम्यान, सोशल मीडियावर पुणेकर बॉसच्या या ऑर्डरची जाम चर्चा आहे. त्यामुळे पुणेकरांना खडूस म्हणून टोमणे मारणाऱ्यांना बॉसने ऑर्डरमधून उत्तर दिलं आहे. पुणेकरही मोठ्या मनाचे असतात हेसुद्धा दाखवून दिलं आहे.