४ वर्षाच्या मुलाचं अपहरण, ``माझ्या चिमुकल्याला ताप असेल, त्याला हे औषध तरी द्या``
लहान मुलं घरात असली की घरनंदनवन भासतं, पण हीच निष्पाप फुले, काही दगडाच्या काळजाची लोकं त्यांच्यापासून हिरावून नेतात, पुण्यात असंच एका ४ वर्षाच्या मुलाचं अपहरण प्रकरण आहे, नेटीझन्सही हे वाचून धास्तावले आहेत.
पुणे : आईवडील आपल्या सततच्या कामात जरी व्यस्त असेल तरी त्यांचं सतत मन चिमुरड्यांवर लागून असतो, घरात पाय टाकताच ज्यांचे बोबडे बोल ऐकण्यासाठी प्रत्येक आईवडीलांचे कान आसुसलेले असतात. ती निष्पाप देवाघरची फुले, घरात असली की घरनंदनवन भासतं, पण हीच निष्पाप फुले, काही दगडाच्या काळजाची लोकं त्यांच्यापासून हिरावून नेतात, पुण्यात असंच एका ४ वर्षाच्या मुलाचं अपहरण प्रकरण आहे, नेटीझन्सही हे वाचून धास्तावले आहेत.
सतिश चव्हाण पुण्यातील बालेवाडीत राहतात त्यांच्या ४ वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे. स्वर्णव चव्हाण असं या मुलाचं नाव आहे, त्याला घरी प्रेमाने डुग्गू म्हणतात. स्वर्णवचा अद्याप पत्ता लागलेला नाही, चिमुरडा घरात नसल्याने हा जन्मदाता खचलाय. अखेर त्याने सोशल मीडियावर अपहरणकर्त्यांना आवाहन केलं आहे, ''हवे तेवढे पैसे घ्या, मागाल ते देतो, पण काळजाचा तुकडा परत द्या''
स्वर्णवला ताप आल्यास त्याला कोणतं सिरप, द्यावं त्याचं आवडतं सिरप कोणतं हे देखील, सतिश चव्हाण यांनी सांगितलं आहे.
सतीश चव्हाण यांनी १७ जानेवारी २०२२ला फेसबूकवर सकाळी ७ वाजता पोस्ट केली आहे...
'माझा मुलगा डुग्गूबद्दल कुठलीही माहिती नाही. आम्हाला तो सापडला का, हे विचारायला फोन नको, कधी झाले, कसे झाले. तुमच्याकडे कुठलीही महत्त्वाची याच्याशी संबंधित माहिती असेल, तर प्लिज फोन करा. 'ज्या कोणी त्याला नेले आहे, मला माझा मुलगा परत द्या, फक्त एकदा फोन करा, तुम्ही मागाल ते आम्ही देऊ, प्लीज आम्हाला फोन करा.' चव्हाण यांनी औषधाचा फोटो देखील शेअर केला आहे.
आपला स्वर्णव सापडल्याच्या अफवा सोशल मीडियावर आहेत, तो आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित असल्याच्या खोटी माहिती दिली गेली आहे, कृपया कुठल्याही दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका, अशी माहिती सतीश चव्हाण यांनी दिली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी देखील डुग्गूला शोधण्यासाठी शोध मोहिम हाती घेतली आहे.