Pune Bypoll: पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) आणि चिंचवडची पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Election) बिनविरोध करण्याच्या भाजप  (BJP) पूर्ण प्रयत्न करतान दिसत आहे. तर दुसरीकेड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना विनंती केली होती. मात्र, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठी घोषणा केली आहे. ट्विट करत त्यांनी (Maharastra Political News) माहिती दिली आहे. (Pune Bypoll Election Kasba Peth and Chinchwad Bypoll Election will not uncontested Nana Patole tweeted Maharastra Political News)


काय म्हणाले Nana Patole?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा मतदार संघात (Pune Bypoll Election) विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष आणि चिंचवड मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे, असं नाना पटोले (Nana Patole Tweet) यांनी ट्विट करत म्हटलं आहे.


पाहा ट्विट - 



कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची (BJP candidates) घोषणा करण्यात आली आहे. कसबा मतदार संघासाठी हेमंत रासने (Hemant Rasne) आणि चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. नाना पटोले यांच्या ट्विटमुळे (Nana Patole On Pune Bypoll) आता निवडणुकीचा थरार पहायला मिळणार आहे.


आणखी वाचा - Supriya Sule: "सध्या वडील पळवायची शर्यत लागलीय", दादांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या...


दरम्यान, महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन केली होती. तर राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे पत्राचा कागद दाखवून निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडीनेही (MVA) निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.