पुणे : आपण आजवर अनेक प्रकारचे फेस्टीव्हल्स बघीतले असतील. पण पुण्यात सध्या एक अनोखा फेस्टीव्हल सुरु आहे. हा फेस्टीव्हल आहे आकर्षक केकचा.. केकीज इंडियानं हा फेस्टीव्हल आयोजित केलाय. या फेस्टीव्हलमध्ये सुमारे ६५० प्रकारचे केक ठेवण्यात आले आहेत. विविध प्रकारचे आकर्षक  डिझाईन्स, फ्लेवर्स तसेच टेस्टचे केक इथं पाहायला मिळत असून, बाहुबलीचा रथ, विमान तसेच लंडन ब्रीजच्या आकाराचे केक इथले आकर्षण ठरत आहेत. हे केक पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केलीय.


१२ फुटांचा केक आकर्षणाचा केंद्रबिंदू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केकीजच्या टीमनं एक महाकाय केक याठिकाणी साकारलाय. विशेष म्हणजे यानिमित्तानं एक विश्व विक्रम देखील होत आहे. तब्बल १२ फुट उंची आणि २ हजार किलो वजनाचा केक इथं साकारण्यात येत आहे. ३० शेफ्स ६ तासांच्या मेहनतीतून हा केक पुर्ण करणार आहेत. पुण्यातील एसएसपीएमएसच्या मैदानावर रविवार रात्रीपर्यंत हा फेस्टीव्हल सुरु असणार आहे. तेव्हा केक शौकीनांनी यावं फेस्टीव्हलला आवर्जुन भेट द्यावी म्हणजे त्यांना केकची अदभूत दुनिया अनुभवता येणार आहे.


पुणेकरांना पर्वणी


या केक फेस्टीव्हलला तुम्हीही भेट देऊन केक खाण्याची आणि पाहण्याचीही हौस भागवू शकाता.