पुणे : पुण्यातील एक हौसिंग सोसायटीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडीत महिलेचं घर तळमजल्यावर आहे. तिच्या बेडरुमच्या खिडकीकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला. एवढंच नाही, तर महिनाभर तिच्या बेडरुममध्ये काय चालले आहे, ३ जण पाहत होते, असा आरोप या महिलेने केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून महिनाभर घरातील बेडरुममध्ये डोकावण्याचा आरोप सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी आणि खजिनदारावर लावण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना पुण्यातील एका सोसायटीत घडला, ही सोसायटी हिंजवडी - वाकड रोडला आहे. ५ ते २८ सप्टेंबर दरम्यान ही घटना घडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.


महिलेच्या तक्रारीनुसार या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी बेडरुममधील चित्रिकरण पाहत होते असा आरोप आहे. बेडरुम ही प्रत्येकाची खासगी बाब असते, त्यात डोकावण्याचा हा प्रकार असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.


आपल्याला जेव्हा लक्षात आलं की, असा प्रकार होतोय, तेव्हा आपण हा सीसीटीव्ही काढून टाका असं सांगितलं, तेव्हा संबंधित आरोपींनी नकार दिला.  तक्रारदार महिलेवर कॅमेरा लावून ५ ते २८ सप्टेंबर दरम्यान खासगी कपड्यात असताना चित्रिकरण करुन ते या आरोपींनी पाहिलं असा आरोप आहे. पुढील तपास संबंधित पोलीस अधिकारी करीत आहेत.