पुणे : शहरात चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा योजनेची चर्चा सुरु असतानाच पुण्याचा पाणी कोटा साडेसहा टीएमसीने कमी करण्याचा आदेश जलसंपदा विभागाने दिला आहे. 


सध्या पुणे पालिका १५ टीएमसी पाणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहराची लोकसंख्या आणि पाणीवापराचे निकष लक्षात घेऊन पुणे महापालिकेला वार्षिक 8.19 टीएमसी पाणीपुरवठा करण्यात यावा, असं या आदेशात म्हटलंय. सध्या वर्षाला सुमारे 15 टीएमसी पाणी वापरणाऱ्या पुणे पालिकेला या आदेशामुळे मोठा झटका बसलाय. 


मात्र महापौर म्हणतात


ही माहिती पुढे आली आहे, माहितीच्या अधिकारातून पण यावर सध्या पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असं पुण्याच्या महापौरांनी म्हटलं आहे.


पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढावण्याची शक्यता


या आदेशाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात धरणं भरलेली असूनही पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झालीय. जलसंपदा विभागाच्या या आदेशामुळे पालिकेच्या तोंडचं पाणी पळालं असून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 


नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता


सरकारने पुणे पालिकेला 2021 पर्यंत वार्षिक 11.50 टीएमसी पाणी मंजूर केलं आहे. त्यानुसार शहराची आजची लोकसंख्या 39.18 लाख गृहित धरून पालिकेला वार्षिक 8.19 टीएमसीपर्यंत पाणीपुरवठा करण्याचा आदेश प्राथमिक विवाद निवारण अधिकारी तथा जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांनी दिलाय.