पुणे : भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी आज पुण्यात काँग्रेस भवनला भेट दिली. कालच काँग्रेस भवन कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. आमदार संग्राम थोपटे यांना ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही म्हणून थोपटे यांच्या समर्थकांनी काल पुण्यात काँग्रेस भवनची तोडफाड केली होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही पडसाद उमटले होते. थोपटे यांच्या छायाचित्राला काळे फासण्यात आले होते. कालच्या घटनेनंतर आमदारथोपटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शहर काँग्रेसकडून केली जात आहे. त्या पर्शवभूमीवर थोपटे यांनी आज काँग्रेस भवनला भेट देत तोडफोड करणारे कार्यकर्ते माझे नव्हते, असे स्पष्ट केले आहे. थोपटे यांनी ते आपले कार्यकर्तेच नाहीत, अशी भूमिका घेतल्याने आता या प्रकरणी पुढे नेमके काय होते याची उत्सुकता आहे. 


तोडफोड प्रकरणाचे दुसऱ्या दिवशी पडसाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राज्य  मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेले काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी  काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली होती. या घटनेमुळे पुण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यानंतर काँग्रेस भवनाची तोडफोड निंदनीय आहे. मला या सगळ्याबद्दल माहिती नव्हते. हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. या सगळ्यात कोणते कार्यकर्ते होते, याची मीदेखील माहिती घेत आहे. तसेच मला पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य असल्याचे यावेळी संग्राम थोपटे यांनी म्हटले होते. आज त्यांनी पाहणी केली. त्यावेळी माझ्या कार्यकर्त्यांचे हे काम नाही. ते माझे कार्यकर्ते नव्हते, असा पवित्रा थोपटे यांनी घेतला आहे.


पुण्यातील शिवाजीनगर काल दुपारच्या सुमारास संग्राम थोपटे यांचे काही समर्थक जमले. सुरुवातीला त्यांनी घोषणाबाजीला केली. यानंतर अचानक दगडफेक सुरु केली. थोपटेंच्या काही समर्थकांनी कार्यालयात येत तोडफोड सुरु केली. त्यांनी शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या कार्यालयातील खुर्च्या, टेबलवरच्या काचा, खिडक्या फोडल्या. दगड मारून टीव्हीही फोडला होता.