अरूण मेह्त्रे, झी मीडिया, पुणे :  व्हॉट्सएप वरील स्टेटसच्या वादातून दोघांचा बळी गेल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील पाटस मध्ये उघडकीस आली आहे. पूर्ववैमनस्यातून झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्करणातील 7 ते 8 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime : Gang of men attack on two friend Murder at Patas ) ही हत्या करून टोळीतील हल्लेखोल दोन फोर व्हीलरमधून पसार झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपींनी त्यांच्या व्हॉट्स ऍपवर 'विकेट तर जाणार, पण क्रिकेटचा खेळ नाही होणार' असं स्टेटस ठेवलं होतं. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवम आणि गणेश गेले होते. त्यावेळी आरोपींची त्यांच्यावर वार करून खून केला. खुनानंतर आरोपी बारामती विमानतळ रस्त्यावर लपून बसले होतs. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना शोधून काढत बेड्या ठोकल्या. त्यांचे आणखी साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.


या घटनेतील आरोपींना ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केल आहे. महेश उर्फ मन्या भागवत, महेश टूले, युवराज शिंदे आणि गहिनीनाथ माने अशी अटक आरोपींची नावे आहेत. शिवम संतोष शितकल आणि गणेश रमेश मारकर या दोघांचा रविवारी रात्री तलवारीने वार करून खून करण्यात आला होता. 


7 ते 8 जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावर काठी आणि तलवारीने हल्ला केला. त्या दोन्ही मृत तरूणांना काही न समजताच हल्ला झाल्याने त्यांना पसारही होता आले नाही. त्यामुळे या हल्ल्यात ते दोघे खाली कोसळले. या अपघातानंतर आरोपींनी पळ काढला.