हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : पुणे जिल्ह्याच्या (Pune) आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द इथल्या एका शाळेत (School) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नववीत शिकणाऱ्या एका  विद्यार्थ्यावर दहावीत विद्यार्थ्याने (Student) भरदिवसा शाळेतच कोयत्याने वार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दहावीतल्या विद्यार्थ्याशी महिनाभरापूर्वी शाळेतच वाद झाला होता. शिक्षकांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटवण्यात आला. पण याचा राग दहावीच्या विद्यार्थ्याने मनात ठेवला होता. वादाचा बदला घेण्यासाठी दहावीतल्या विद्यार्थ्याने चक्क शाळेत कोयता आणला. नववीतल्या विद्यार्थी शाळेत असताना त्याच्या पाठिमागून कोयत्याने तीन ते चार वार केले. या हल्ल्यात मुलाच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी मुलाच्या डोक्याला 7 तर हाताला 4 टाके पडले असून त्याच्यावर मंचर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


या वादानंतर शाळेची सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मुलांमध्ये एवढे धाडस आलं कुठून? शाळेत कोयता आणूनही शाळेच्या सुरक्षारक्षकांच्या लक्षात आलं कसं नाही? यांसारखे अनेक मुद्दे सध्या समोर येत असून या प्रकरणी आता पोलिस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.