Pune Crime : देशभरात स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) उत्साह साजरा केला जात असताना पुण्यात (Pune News) राष्ट्रध्वजाचा (Indian Flag) अपमान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्क भागातील एका पबमध्ये एका युक्रेनियन गायिकेने राष्ट्रध्वज प्रेक्षकांमध्ये भिरकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Pune Police) या गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील मुंढवा येथील एका क्लबमध्ये रविवारी रात्री एका कार्यक्रमादरम्यान भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी प्रसिद्ध युक्रेनियन गायिका उमा शांतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमा शांतीसह कार्तिक मोरे (रा. औंध) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. कोरेगाव पार्क भागातील हॉटेल फ्रेक सुपर क्लबमध्ये रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीस हवालदार तानाजी देशमुख (वय 45) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्कातील हॉटेल फ्रेक सुपर क्लबमध्ये कार्तिक मोरे याने स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम एक आयोजित केला होता. शांती पिपल म्युझिक बँडमधील गायिका उमा शांती हिने गाताना दोन्ही हातात भारताना राष्ट्रध्वज घेतला होता. राष्ट्रध्वज हातात धरुन ती नाचत होती. त्यानंतर तिने प्रेक्षकांमध्ये राष्ट्रध्वज भिरकावला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांपर्यंत तो पोहोचला. व्हिडीओ समोर येताच पोलिसांनीक गायिका उमा शांती आणि आयोजक कार्तिक मोरेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप जोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.