Pune Crime News : सध्या सर्वत्र डेटींग अॅपचं खुळ जरा जास्तच वाढल्याचं दिसतंय. मात्र, याच डेंटिंग अॅपचा वापर लोकांना लुबाडण्यासाठी देखील केला जात असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हे प्रकरण आले बंटी आणि बबलीचं... बंटी-बबलीने देशभरात तरुणांना ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळल्याची माहिती मिळाली आहे. एका डेटिंग अॅपच्या (Dating app) माध्यमातून या दोघांनी हा पराक्रम केला आहे.  दोघांकडून तब्बल 50 लाख 69 हजारांचा ऐवज लुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांच्या (Pune Police) तपासानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंटी उर्फ नितीश नवीन सिंग हा बिहारचा राहणारा असून त्याने बबली उर्फ कविता नवीनचंद्र भट हिच्यासोबत कट रचला अन् लोकांना लुटण्यास सुरूवात केली. या दोघांनी आत्तापर्यंत पुण्यात तब्बल 7 जणांना लुटल्याची माहिती समोर आली आहे. सीकींग अ‍ॅडव्हेंचर डेटिंग अ‍ॅपद्वारे यांनी तरुणांना आणि पुरूषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं अन् त्यांना धमकवून पैसे लुबाडले. 


नेमकं काय करायचे बंटी बबली? 


झालं असं की, बिहारमधील एका इव्हेंटच्या कामानिमित्ताने ओळख झाली होती. दोघांची मैत्री झाली अन् प्रेमात पडले. त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं. मात्र, त्याचवेळी त्यांनी डेटिंगच्या माध्यमातून लोकांना फसवण्याचा डाव सुरू केला. डेटिंग साईटवरील अनेक अ‍ॅपवर बंटीने तिचे वेगवेगळ्या नावाने प्रोफाईल तयार केले. हळूहळू बोलणं सुरू असायचं. त्यामुळे लोक बबलीच्या जाळ्यात अडकत गेले. लोकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करायची अन् रुममध्ये प्रेमी आला की त्याकडे पैसे मागायचे. त्याचवेळी बंटी रुममध्ये येयचा अन् दमदाटी व मारहाण करुन रक्कम लुटली जायची. एवढंच काय तर सोनं देखील चोरून प्रेमीला मोकळं करायचे. त्याच्याकडून एटीएमचा पिन जाणून घेऊन, त्याच्याकडून आणखी रक्कम उकळली जात असायची. अशाप्रकारे आत्तापर्यंत पुण्यातील 7 जणांना बंटी आणि बबलीने लुटलं आहे.


आणखी वाचा - पुण्यातील फ्लॅटमध्ये हात-पाय बांधलेल्या अवस्थेत सापडले पती-पत्नीचे मृतदेह, गूढ कायम


दरम्यान, डेटींग अ‍ॅपद्वारे नागरिकांना जाळ्यात ओढून लुटमार करणार्‍या महिलेसह दोघांकडून ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत ५० लाख ७० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, अशाच पद्धतीने फसवणूक झालेल्यांनी सामाजिक सुरक्षा विभागात संपर्क करावा, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांनी दिली आहे.