Sharad Pawar : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापलं होतं. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून त्यांना परत पाठवण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांच्या वतीने गेल्यावर्षी 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची (pune bandh) हाक देण्यात आली होती. यावेळी भाजप, मनसे व्यतिरिक्त सर्वच संघटना पुण्याच्या रस्त्यावर उतरल्या होत्या. यावेळी एका महिलेने बंदमध्ये सहभागी होण्यास नकार देत दुकान बंद करण्यास विरोध केला. यानंतर काही प्रमाणात वादही झाला होता. यानंतर फेसबुकवर या महिलेची बदनामी केली जात असल्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं?


राज्यपालांच्या अवमानकारक वक्तव्यावर निषेध करण्यासाठी पुण्यात 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक देण्यात आली होती. त्यावेळी बंदमध्ये सहभागी असलेले काही जण लोकांना दुकाने बंद करण्यास सांगत होते. त्यावेळी एका महिलेने दुकान बंद करण्यास नकार देत हीच महाराजांची शिकवण आहे का असे म्हटले होते. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर आता त्याच महिलेची आता फेसबुकवर फेक अकाउंट काढून बदनामी केली जात असल्याचे समोर आले आहे. बदनामी करणाऱ्या व्यक्तीविरोधात आता या महिलेने डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.


फेक अकाउंट काढून महिलेची बदनामी


पुण्यातील एका नामांकित रस्त्यावर या महिलेचे दुकान आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपालाविरुद्ध महाविकास आघाडी आणि इतर सामाजिक संघटना यात सहभागी झाल्या होत्या. पुणेकरांनी रस्त्यावर उतरत या बंदला प्रतिसाद दिला होता. मात्र या महिलेने काही लोकांनी दुकान बंद करण्यास सांगितले. यावेळी दुकान बंद करण्यास नकार देत तुम्ही शिवाजी महाराजांची शिकवण घ्या असं सुनावले होते. याबाबत फिर्यादी महिलेने स्वतःच्या फेसबुक अकाउंट वर एक लेख देखील लिहिला होता. पुणे बंदच्या पाठीमागे शरद पवार आणि महाविकास आघाडी असून या दोघांनी हिंदू धर्मामधील जातीजातीमध्ये भांडण लावण्याचे काम केलं आहे असा आरोप करून पुणे बंदचा निषेध केल्याचा एक लेख या महिलेने लिहिला होता. त्या लेखावर उत्तर देण्यासाठी एका व्यक्तीने बनावट फेसबुक अकाउंट बनवून अतिशय बदनामीकारक खालच्या भाषेमध्ये कमेंट बॉक्समध्ये त्याला उत्तर दिलं होतं. त्याचबरोबर या महिलेचे दुकान आम्हाला माहिती आहे असेही म्हटले होते. यानंतर महिलेने डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांनी वाचला गटबाजीचा पाढा...


दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्यासह आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी चक्का शरद पवारांसमोर पक्षातील अंतर्गत गटबाजीचा पाढा वाचला.


'पवार साहेब कात्रज दूध संघ,पीएमआरडीए या कमिट्यांवर पक्षातील पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली नाही. तसेच साहेब पक्षातील गटतट दूर झाल्यास पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आपली एक हाती सत्ता येईल, असे कार्यत्यांनी सांगितलं. 


त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात रोजगार नसल्याने अनेक कुटुंब तालुक्यामधून शहरात जात आहे.त्यामुळे तालुका विस्थापित होत आहे. हे लक्षात घेऊन नवनवीन रोजगार कसे येतील यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. यासह असंख्य समस्या आणि पक्षातील अंतर्गत गटबाजीचा पाढाच पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांसमोर वाचवून दाखविला.


राष्ट्रवादीकडून 'स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज' पोस्टर 


विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या वर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात भाजपने आंदोलन केलीत. त्यानंतर अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोललेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. त्यानंतर आता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांना पाठिंबा देण्याची काही पोस्टर गाड्यांवर आणि राष्ट्रवादी शहर पक्षाने काढले आहेत. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक असा उल्लेख असल्याचे हे पोस्टर आता व्हायरल झाले.