हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या (Pune Crime) शिक्रापूर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन मुलींनी एका जेष्ठ महिलेला निर्दयीपणे मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी दोन्ही तरुणींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, वृद्ध महिलेच्या अंगावर बसून तरुणीने तिला मारहाण केल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणाऱ्या दोन बहिणी असून त्यांना त्यांची आई देखील यामध्ये साथ देताना दिसत आहे. तर मारहाण झालेली वृद्ध महिला ही शेजारी राहत असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये दोन मुली आणि त्याच्या आई विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधित मुलींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.