Pune Crime News : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप आमदाराच्या मामाचे भर दिवसा अपहरण झाले. यानंतर सायंकाळी मृतदेह सापडला.  या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. 
भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांची हत्या झाली आहे. यवत गावाच्या हद्दीत मृतदेह सापडला आहे.  याप्रकरणी योग्य तपास करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतिष वाघ हे मॉर्निंग वॉकला गेले होते.  यावेळी चौघांनी त्यांची अपहरण केल्याची घटना घडली. सोलापूर रस्त्यावरील शेवाळ वाडीजवळ कारमधून आलेल्या चौघांनी वाघ यांचे अपहरण केले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असताना पुणे शहरापासून जवळपास 45 किलो मीटर अंतर असलेल्या यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे.या प्रकरणी अज्ञात चौघांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बीडमध्ये सरपंचाचे अपहरण करून हत्या


केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.  मस्साजो ग चे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख हे त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे दोघे दिनांक ९ डिसेंबर रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो गाडी क्र.(एम एच ४५/बी ३०३२) मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी शिवराज देशमुख ड्राईव्ह करत होते. ते केज येथुन मस्साजोगकडे जात असतांना डोणगाव फाट्याच्या जवळ असलेल्या टोलनाक्या जवळ एका काळ्या रंगाची स्कार्पिओ आडवी लावली. वाहनातून सहा इसम खाली उतरले. त्यातील एकाने दरवाज्याची काच दगडाने फोडुन सरपंच संतोष देशमुख यांना बाहेर ओढून लाकडी काठीने मारहाण केली. यानंतर त्यांचे अपहरण करुन हत्या केली.