सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune News) सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. टोळीयुद्धापासून गंभीर गुन्ह्यांसारखे (Pune Crime) प्रकार सुसंस्कृत पुण्यात वारंवार होताना दिसत आहेत. पोलिसांकडून (Pune Police) विविध प्रयत्न करुनही गुन्हेगार सर्रासपणे गुन्ह्यांना तोंड देत आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने सगळं पुणे हादरुन गेले आहे. पुतण्यानेच त्याची काकी आणि भावंडांचा निर्घृण खून केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पुतण्याने महिलेला तिच्या दोन मुलांना जाळले आहे (nephew burned the aunt alive). पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या पिसोळी येथे महिला आणि तिच्या दोन मुलांना हत्या करुन जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा महिलेचा पुतण्या असून त्याने अनैतिक संबंधातून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन दिवसापूर्वीच पुतण्याने तिघांचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी पुतण्या तिघांचा मृतदेह एका पत्राच्या खोलीत जाळत होता. बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास कोंढवा पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता हे भयानक दृश्य समोर आले.


आरोपी पुतण्या हा लातूर येथील राहणारा असून त्याचे काकीसोबत अनैतिक संबंध असल्याचे म्हटले जात आहे. त्यातूनच हे हत्याकांड घडले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी पुतण्याने काकीसह दोन भावंडांचा गळा आवळून खून केल्यानंतर त्यांना पत्रात घरातच जाळण्याचा प्रयत्न केला. घरातील साहित्य वापरुन आरोपी पुतण्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिघांचे मृतदेह दिले. बुधवारी रात्री हा सर्व प्रकार सुरु होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही समोरचे दृश्य पाहून धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा पिसोळी येथे सुरक्षा रक्षकाचे काम करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.


किरकोळ भांडणावरुन मित्रांनीच केला अल्पवयीन मुलाचा खून


पुण्यात्या कात्रजजवळील मांगडेवाडी परिसरात बुधवारी दुपारी एका अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे संशयित तिघेही मृत अल्पवयीन मुलाचे मित्र असल्याचे समोर आले आहे. बुधवारी दुपारी मांगडेवाडी परिसरात पूर्वीच्या भांडणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. याच वादातून अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली.