सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुनील कांबळे पुन्हा वादात सापडले आहेत. ससून रुग्णालयात आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली आहे. ससून रुग्णालयाती एका कार्यक्रमात सुनील कांबळे यांनी थेट पोलिसावरच हात उचलला आहे. त्याआधी सुनील कांबळे यांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यालाही मारहाण केल्याचा आरोप आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार कार्यक्रमासाठी उपस्थित असतानाच हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जितेंद्र सातव असे मारहाण झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. जितेंद्र सातव हे राष्ट्रवादी वैद्यकीय पक्षाचे केंद्र प्रमुख आहेत. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वॉर्ड उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे. पायऱ्यावरुन खाली उतरच असतानाच सुनील कांबळे यांनी पोलीस हवालदाराच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. याआधीसुद्धा सुनील कांबळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुण्याच्या आनंद नगर झोपडपट्टीत सुनील कांबळे नागरिकांना धमकावत असतानाचा व्हिडीओ समोर आला होता.


नेमकं काय घडलं?


हा सगळा प्रकार ससून रुग्णालयात अजित पवार यांच्या पाहणी दरम्यान घडला. ससून रुग्णालयात वॉर्डची पाहणी करताना वैद्यकीय मदत सेलचे जितेंद्र सुरेश सातव यांच्यासोबत सुनील कांबळे यांचा वाद झाला होता. त्यावेळी ए सरक तिकडं, असं म्हणल्याने भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांना राग अनावर झाला आणि त्यानी सातव यांना मारहाण केली. त्यानंतर सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यालाही  कानशिलात लगावली. हा सगळा प्रकार व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.


नेमकं काय घडलं?


उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात विविध कार्यक्रमांसाठी सकाळीच आले होते. यावेळी पुण्यातील ससून रुग्णालयात अजित पवार यांच्या हस्ते विविध वॉर्डचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. त्याचवेळई तृतीयपंथीसाठी केलेल्या नवीन वार्डचेही अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, सह भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे हे उपस्थित होते. त्याचदरम्यान, हा सगळा प्रकार घडला.


ससून रुग्णालयात अजित पवार यांच्या पाहणी दरम्यान हा गोंधळ उडाला. ससून रुग्णालयात वॉर्डची पाहणी करताना वैद्यकीय मदत सेलचे जितेंद्र सुरेश सातव यांच्यासोबत सुनील कांबळे यांचा वाद झाला होता. त्यावेळी ए सरक तिकडं, असं म्हणल्याने भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांना राग अनावर झाला आणि त्यानी सातव यांना मारहाण केली. त्यानंतर सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यालाही  कानशिलात लगावली. हा सगळा प्रकार व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.