Pimpri Firing News : पिंपरी चिंचवड शहरासोबत आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतं आहे. तळेगावमधील किशोर आवारे यांच्या खुनाची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवड पुन्हा एकदा हादरलं आहे. सोमवारी भरदिवसा एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. गेल्या महिनाभरातली ही खुनाची तिसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी शिरगावमधील सरपंचाचा भर चौकात खून करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


काय घडलं नेमकं ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुण सोमवारी दुपारी चिखली या परिसरातील क्षेत्र टाळगाव प्रवेशद्वाराजवळ चप्पल शिवण्यासाठी गेला होता. त्यावेळी बाइकवर दोन अज्ञात आले आणि त्यांनी तरुणावर गोळीबार केला. त्यानंतर मारेकरी बाइकवरुन फरार झाले. दरम्यान कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर असं मृत्यू तरुणाचे नाव आहे. 


घटनास्थळावरील नागरिकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड परिसरात दहशतीचं वातावर आहे. (pune crime sonya pansare murder pimpri chinchwad firing maharashtra news)


मित्रानेच केला गेम!


या हत्येमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोन्या याची हत्या त्याचा जवळच्या मित्रानेच केल्याचं समोर आली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी सौरभ उर्फ सोन्या पानसरे आणि सिद्धार्थ कांबळे यांची नावं समोर आली आहे. असं सांगण्यात येतं आहे. या गोळीबाराचं कारण अद्याप समोर आलं नसून पण मिळालेल्या माहितीनुसार सोन्या आणि संशयित आरोपींमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादातूनच ही हत्याचा झालाचा संशय पोलिसांना आहे.