Pune Crime: बसमध्ये दिवसाढवळ्या विनयंभग, बारावीचा विद्यार्थी तरुणीजवळ जाऊन बसला आणि....`
Pune Crime: तरुणी पौड रोस्त्यावरील बस थांब्यावर उतरुन घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग सुरु केला. यामुळे तरुणीला आणखीनच धक्का बसला.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: पुण्यात दिवसाढवळ्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर बसमधील सहप्रवाशांना मोठा धक्का बसला. पीएमपी प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याची घटना पौड रस्त्यावर घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाने हा प्रकार केल्याने याची भीषणता अधिकच असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांकडे तक्रार देणाऱ्या फिर्यादी तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. खासगी शिकवणीहून ती पीएमपी बसने घरी जाताना तिच्यासोबत हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या या प्रकाराने ती घाबरली होती. फिर्यादी तरुणी घरी बसने घरी चालली असताना आरोपी तिच्या बाजूला येऊन बसला. त्यानंतर त्यानंतर त्याने अश्लील वर्तन करायला सुरुवात केली.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तरुणी पौड रोस्त्यावरील बस थांब्यावर उतरुन घरी जात असताना त्याने तिचा पाठलाग सुरु केला. यामुळे तरुणीला आणखीनच धक्का बसला.
घरी गेल्यावर तरुणी खूपच घाबरलेली दिसली. घरच्यांनी तिची विचारपूस केली. तेव्हा घडलेला प्रकार तिने घरच्यांना सांगितला. यानंतर तरुणीच्या घरच्यांनी माहिती वारजे पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.
अश्लील चाळे आणि गैरवर्तन केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोस्को), तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
शिक्षिकेसोबत विनयभंगाचा प्रकार
शाळेच्या गेटवरच शिक्षिकेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान पोलिसांना ही पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. पण ज्या शाळेत आपण विद्यार्थ्यांना शिकविणार त्या शाळेच्या गेटवरच असा प्रकार घडल्याने शिक्षिकेला जबर मानसिक धक्का बसला आहे. या शिक्षिका मिठानगर येथील एका प्राथमिक शाळेत पीटी टीचर म्हणून काम करतात. पुण्यात घडलेल्या या घटनेत तिघांनी शिक्षिकेचा विनयभंग तर केलाच पण तू शाळेत जायचे नाहीस अशी धमकी देखील तिला दिली. त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले आहे.
पुण्यातील कोंढवा भागातील प्राथमिक शाळेतून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे शिक्षिका म्हणून काम करणार्या ३६ वर्षीय शिक्षिकेसोबत विनयभंगाचा प्रकार समोर आला आहे. या महिलेला शाळेच्या गेटवरच अडविण्यात आले. त्यानंतर तिचा हात हातात घट्ट पकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.