DRDO संचालकाचे कारनामे उघडे, पाकिस्तानी हेरांना परदेशात भेटले
पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओच्या (DRDO) संचालकाचे धक्कादायक कारनामे पोलीस तपासात समोर आले आहेत. केवळ आर्थित लाभासाठी भारताची गोपनिय माहिती पुरवत असल्याचा संशय आहे.
DRDO Director Arrested : हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकलेल्या डीआरडीओ संचालकाने (DRDO Director) पाकिस्तानच्या (Pakistan) हेरांशी परदेशात जाऊन भेट घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. ATSच्या चौकशीतून ही माहिती उघड झालीय. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओ संचालकानं भारताची गोपनीय माहिती (Confidential Information) पाकिस्तानी हेरांना दिल्याचा संशय आहे. संचालकाला स्मार्टफोन (Smartphone) वापरण्यास बंदी होती. तरीदेखील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून गोपनीय माहिती पाकिस्तानी हेरांना दिली. हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर हा हेर पाकिस्तानला फितुर झाला आणि त्यानं सर्व माहिती पुरवली.
अशी पुरवली माहिती
डीआरडीओ संचालकाने गोपनीय महिती पाकिस्तानी हेरांना दिली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून पाकिस्तानी हेरांना ते माहिती पुरवत होते. डीआरडीओ संचालक आणि पाकिस्तानी हेर यांच्यात परदेशात भेटही झाली होती. आर्थिक लाभासाठी संचालकाने माहिती पुरवल्याचा संशय आहे. सपरवानगी नसतानाही हा संचालक स्मार्ट फोनचा वापर करत होता. परराज्यातील काही जणांच्या तो संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. आता पोलिसांनी डीआरडीओ संचालकाकडून लॅपटॉप, मोबाईल संच, चार्जर जप्त केला आहे.
गोपनिय माहिती दिली
DRDO च्या संचालकाने पदाचा गैरवापर करत त्यांच्या अखत्यारित असलेली संवेदनशील शासकिय माहिती पाकिस्तानला (Pakistan Intelligence operative) पुरवल्याचा आरोप आहे. त्यांच्या ताब्यात असलेली संवेदनशील शासकिय गुपितं जी शत्रू राष्ट्राला मिळाल्यास भारतच्या सुरक्षिततेला धोका पोहचू शकतो अशी माहिती अनधिकृतरित्या शत्रू राष्ट्राला पुरवली. याबाबत दहशतवादी विरोधी पथकाने पाळत ठेवत त्याला अटक केली. हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाक इंटेलिजन्स ॲाफिसरला दिल्याचं स्पष्ट झालं आहे. या संचालकाच्या निवृत्तीला सहा महिने राहिले उरले होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते मोबाईलच्या माध्यमातून पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या महिलेसोबत संपर्कात होते.
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन संस्थेचं प्रमुख कार्यालय हे पुण्यात आहे. संरक्षण विभागातील महत्त्वाचं संशोधन हे पुण्यातील या कार्यालयातून होत असतं. पुण्यात सातत्याने दहशतवादाचं केंद्र बनवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होतोय. अशा परिस्थितीत डीआरडीओचे संचालक सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकत असतील तरी ती अतिशय गंभीर बाब आहे.
अधिकारी अडकला हनीट्रॅपमध्ये
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने तरुणींच्या माध्यमातून वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे लष्कराने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जवानांनाही सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी आणली होती.. आता डीआरडीओच्या संचालकांपर्यंत पाकिस्तानी हनी ट्रॅप पोहचल्याचं समोर आलंय. त्यामुळे भारतीय यंत्रणा अलर्ट झाल्यात. या हनीट्रॅपची पाळमुळं खणून काढण्यासाठी आता ऑपरेशन हाती घेण्यात आलंय.