पुणे : पुणे एक्स्प्रेस हायवेवरील टोल वसुली २०१९ पर्यंत थांबवता येणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र एमएसआरडीसीनं न्यायालयात सादर केलय. एक्स्प्रेस हायवेवरील टोल वसुलीचे कंत्राट आयआरबी कंपनीकडे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्स्प्रेस हायवेवरील टोल वसुलीचे उद्दिष्ट २०१६ मधेच पूर्ण झालं असून त्यानंतर सुमारे ३४६ कोटींची अतिरिक्त वसुली झाल्याचा दावा आरटीआय कार्यकर्त्यांनी केलाय. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलीय. 


एक्स्प्रेस हायवेवरील टोल वसुली ही करारानुसार सुरु असल्याचं एमएसआरडीसीनं म्हटलंय. मात्र यापूर्वी राज्यात ज्या पद्धतीनं टोल  नाके बंद करण्यात आले त्यापद्धतीनं एक्स्प्रेस हायवेवरील टोल नाके मुदती आधी का बंद होऊ शकत नाहीत असा प्रश्न याचिका कर्त्यांनी उपस्थित केलाय.