Pune Girl Death: कामाच्या अतीतानामुळे एका 26 तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केलाय.अ‍ॅना सेबेस्टियन पेरायिल असं निधन झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचं नाव होतं. तरुण वयात आपली पोटची मुलगी गमावल्याने अ‍ॅनाच्या निधनामुळे तिच्या घरच्यांना जबर धक्का बसलाय. अॅना ही अर्न्स्ट & यंग या विख्यात कंपनीत काम करत होती.अॅनाच्या मृत्यूनंतर या कंपनीच्या विरोधात सोशल मीडियावर टीकेचा भडीमार होताना दिसतोय. अॅनाच्या आईने यासंदर्भात पत्र लिहित कंपनीवर आरोप केले होते. आता केंद्राकडून याप्रकरणाची दखल घेण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अ‍ॅनाने मार्चमध्ये ईवाय पुणे या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. जुलै महिन्यात तिचं निधन झालं. मात्र मृत तरुणीच्या आईने लिहलेले भावनिक पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल होतंय.


काय आहे प्रकरण?



चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या अ‍ॅना यांच्या आईने तिच्या ऑफिस मधील वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मृत तरुणीच्या आईने पत्र लिहून आपला राग व्यक्त केला आहे. ॅनाच्या कार्यालयातील वरिष्ठ तिला इतकं काम द्यायचे की ती गेल्या काही दिवसांपासून खूप तणावात होती. तिच्यावर कामाचं दबाव टाकला जात होता. कामाच्या ओझ्याखाली असलेली आमची लेक मरण पावली आहे, असा आरोप तिच्या आईने पत्रातून केलाय. 


या घटनेच्या संदर्भात त्या कंपनीने सुद्धा दखल घेत ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आम्ही एक उत्तम कार्यालय आणि तिथले वातावरण पोषक ठेऊ आणि अ‍ॅना यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील होतो असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलंय.दरम्यान केंद्रीय श्रम शक्ती मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदर्श दिले आहेत.