पुणे : पुण्यात गुरुवारी रात्री पावसाने घातलेल्या थैमानामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. याच अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात एक लहान चिमुकला अडकला होता. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाण्याआधीच अग्निशमन दलाचे जवान मारुती देवकुळे यांनी तप्तरता दाखवत या बाळाचे प्राण वाचवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातल्या मित्रमंडळ चौक इथे ही घटना घडली. बाळाला वाचवतानाची ही दृश्य कोणीतरी आपल्या कॅमेरात चित्रीत केली. ही दृश्य पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. 


पुण्यात काल रात्री ढगफुटीसदृष झालेल्या पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यात एका रात्रीत पावसाने १० बळी घेतले. सलग २ तासाच्या पावसाने शहर आणि परिसरात अक्षरश: कहर केला. अनेक वस्त्या, सोसायट्या तसेच झोपडपट्टी भागांत पाणी शिरले. रस्ते पाण्याखाली जाऊन त्यांना ओढ्याचं स्वरुप आले.