पुणे: कोरोनाचा संसर्ग आता कुठे नियंत्रणात येत असताना तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे. राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. कोरोनामुळे अनेक लग्न पुढे गेली तर काही जणांनी कुटुंबात कमी लोकांमध्ये लग्न उरकली. मात्र कोरोना आणि त्यानंतर आता राज्यात आलेल्य़ा झिकाने मात्र टेन्शन वाढलं आहे. कोरोनामुळे लैंगिक संबंधांवर अनेक मर्यादा आल्या त्यामध्ये आता झिकाचा संसर्ग आल्याने चिंता वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चक्क एका गावात सरपंचांनी झिकाच्या पार्श्वभूमीवर मोफत कंडोम वाटण्याचा अनोखा उपक्रम केला. झिका व्हायरसमुळे लोकांच्य़ा जीवाला धोका आहे. पुण्यात पहिला झिकाचा रुग्ण आढळला आणि खळबळ उडाली. पुण्यातील बेलसर गावात झिका व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्व स्तरावर उपयायोजना सुरू आहे. त्य़ाच पार्श्वभूमीवर गावात ग्रामपंचायतीकडून मोफत कंडोम वाटण्यात आली.


आता अनेकांना प्रश्न पडला असेल झिका आणि मोफीत कंडोम वाटण्याचा काय संबंध आहे. तर या गावात महिलांची पुढचे 4 महिने गर्भधारणा टाळण्य़ासाठी मोफत कंडोम वापरण्याचा घाट सरपंच आणि आरोग्य संस्थेनं घातला आहे. पुण्यात झिकाचा रुग्ण सापडल्याने त्याचा संसर्ग पसरू नये किंवा झिकाचा संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊच उचलण्यात आलं आहे. 


झिकाचा धोका लक्षात घेऊन महिलांना पुढचे 4 महिने गर्भधारणा टाळावी असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. पुणे जिल्ह्यात 79 गावांमध्ये झिकाचा संसर्ग पसरल्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य विभागाकडून तपासण्या सुरू आहेत. आरोग्य विभागाने या गावात अलर्ट जारी केला आहे. झिकाचा संसर्ग टाळण्यासाठी मोफत कंडोमचं वाटप कऱण्यात आलं आहे.