पुणे : येथील प्रसिद्ध व्यवासायिक गौतम पाषाणकर (Gautam Pashankar) बेपत्ता आहेत. गेल्या नऊ दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. मात्र या प्रकरणात आता नवे वळण लागले आहे. पाषाणकर यांचे अपहरण झाल्याचा संशय त्यांचा मुलगा कपिल यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम पाषाणकर हे पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आहे. व्यवसायीक नुकासान झाल्याच्या कारणाहून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी सापडली होती. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. मात्र गौतम पाषाणकर यांच्या आत्महत्येमागे राजकीय हात असल्याचा संशय त्यांचा मुलगा कपिल पाषाण यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे. 


पाषाणकर बुधवारी नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. त्यानंतर ते लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या कार्यालयात गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील कार्यालयामध्ये आल्यावर त्यांनी एक बंद लिफाफा चालकाकडे देऊन तो घरी देण्यास सांगितले. त्यानंतर पाषाणकर कार्यालयामधून बाहेर पडून सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.


दरम्यान, पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पाच पथके तयार केली आहेत. तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यांचा माग काढला जात आहे. शहरातील हॉटेलमध्येही त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांना सुखरूप घरी आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या अपहरण झाल्याचा आता संशय व्यक्त होत आहे.