सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : आरोग्य भरतीच्या 'गट ड' चा तपास सुरू असतानाच आरोग्य भरतीच्या 'गट क' चा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. झी २४ तासच्या हाती याचा एक्सक्लुझिव माहिती आणि फोटो समोर आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MPSC समन्वय समितीने गंभीर आरोप केला आहे. व्हॉट्सऍप ग्रूपवर परीक्षेआधीच पेपर आल्याचा आरोप करण्यात आला. फुटलेला नर्सिंग पेपर खऱ्या पेपर सोबत १००% मॅच झाला असून, गट-क पेपरफुटीचा तपास सुरू आहे.


व्हॉट्सऍप ग्रुपवरील मेंबर्सना सकाळी 11 वाजता सायबर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी साठी बोलावलंय...गट क आणि गट ड पेपर फोडणारे धागेदोरे सायबर पोलीस शोधणार आहेत. 



या अगोदरही भरतीच्या परीक्षांमध्ये गोंधळ झाल्याच पाहायला मिळालं आहे. अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांचं मनोबळ कमी होतं. दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा प्रचंड मनस्ताप झाला आहे. 


आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या 'गट क'चा पेपरही फुटल्याचा आरोप होता आहे. परीक्षेआधीच व्हॉट्सऍपवर पेपर आल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास  आली आहे.