Pune Weather Alert: गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे पुणेकरांची दैना उडाल्याचं समोर आलं होतं. अशातच आता येत्या 48 तासात मुठा आणि पवना नदीपात्रात पावसाच्या अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावं, असं आवाहन पीएससीकडून करण्यात आलंय.


पीएमसीने काय म्हटलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे शहराजवळील खडकवासला धरण ८०%, पानशेत ९४% आणि टेमघर ७८% एवढ्या क्षमतेने भरलेले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराशी सलग्न असलेले पवना धरण ८४% क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे, असं पुणे महानगरपालिकेने म्हटलं आहे.


रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे अतिवृष्टीचा अंदाज दिल्यामुळे पुढील ४८ तासांत मुठा व पवना नदीपात्रात पर्जन्यमानानुसार व येव्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत खडकवासला व पवना धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू असुन पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्यात येईल, असं पीएमसीकडून सांगण्यात आलं आहे.


दरम्यान, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी मुठा नदीपात्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी पवना नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन एरिया) उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये, असा इशारा देखील आला आहे.