Puns Accident : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असताना शिरुर (Shirur) तालुक्यातही एका अल्पवयीन मुलीनं तरुणाला चिरडलंय. 15 वर्षीय मुलीनं पिकअप चालवताना बाईकला धडक दिली. त्यात 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झालाय. हा अपघात एवढा गंभीर होता की पिकअपनं बाईकसह चालकास 20 ते 30 फुट फरफटत नेलं. त्यात बाईकचालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र बांडे हा जखमी झालाय. धक्कादायक म्हणजे अपघातावेळी चालक मुलीसह वडीलही बाजूला बसले होते. या अल्पवयीन मुलीनं पिकअप भरधाव वेगात चालवून बाईकला धडक दिली. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रेननं सायकलस्वाराला चिडवलं
पुण्यात आणखीन एक भीषण अपघात झालाय. पुण्यातील कर्वेरोडवर एका क्रेननं सायकलस्वाराला चिरडलंय. या दुर्घटनेत सायकलस्वार जागीच ठार झालाय. या दुर्घटनेनंतर क्रेनचालक पसार झाला होता मात्र पोलिसांनी त्याला अटक केलीये. सलीम अली असं या क्रेन चालकाचं नाव आहे..


अल्पवयीन आरोपीची चौकशी
दरम्यान, पुणे  पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची पुणे पोलिसांनी चौकशी केली. त्याच्या आईच्या उपस्थितीत तब्बल दीड तास ही चौकशी चालल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. घरातून किती वाजता निघाला?, कोझीज् आणि ब्लॅक बारमध्ये काय घडलं?, गाडी चालवत असताना गाडीचा वेग किती होता?, गाडीत किती जण होते? अशा प्रकारचे प्रश्न पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. बाल निरिक्षण गृहात झालेल्या या चौकशीत मुलाकडू समाधानकारक उत्तर मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.


अल्पवयीन आरोपीच्या आईची चौकशी
अल्पवयीन मुलाच्या आईची पुन्हा चौकशी केली जातेय. चौकशीत आरोपीची आई शिवानी अग्रवाल (Shivani Agarawal) उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ब्लड सॅम्पल बदलणे, पुरावे नष्ट करणे, कट रचणे आणि इतर घटनाक्रमामध्ये सहभाग तपासला जातोय...सबळ पुरावे हाती लागल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवानी अग्रवालला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आलाय. 


अजित पवारांकडून आमदाराची पाठराखण
पुणे कार अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण करण्यात आलीय...सुनील टिंगरेंवरील आरोप बिनबुडाचे असून, टिंगरे लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले होते...सुनील टिंगरेंनी पोलिसांवर दबाव टाकलेला नाही...तसंच त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. याप्रकरणात कोणतीही लपवाछपवी किंवा कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार होत नाहीये...आजपर्यंत चौकशीत जे जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होत असल्याची माहिती अजित पवारांनी दिलीय...