पुणे : समुद्रकिनाऱ्यावर किंवा बागेत खासकरून कपल्स गप्पा मारत बसतात. मात्र पुण्यात एका कब्रस्तानानध्ये एक कपल बसून गप्पा मारत होतं. इतकंच नाही तर ज्यावेळी या प्रेमी युगुलाला हटकलं तेव्हा त्यांनी सुरक्षा रक्षकाला जबर मारहाण केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यामध्ये ही घटना घडली आहे. बुधवारी दुपारी दापोडी परिसरात असलेल्या कब्रस्तानामध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीच्या प्रकरणात सुरक्षारक्षक आझम खान हे जखमी झाले आहेत.


दापोडीतील कब्रस्तानमध्ये हे जोडपं गप्पा मारत बसलं होतं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांना हटकलं. इतकंच नाही तर त्याने जोडप्याला हाकलून दिलं. याचा राग तरूणाला आल्यानंतर त्याने काही साथिरदारांच्या मदतीने सुरक्षारक्षकाला जाऊन जबर मारहाण केली. यामध्ये सुरक्षारक्षक जखमी झाला आहे.


दरम्यान आझम खान यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. चार जणांविरोधात ही तक्रार दाखल झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझम खान हे कब्रस्तानमध्ये काम करतात. बुधवारी दुपारी त्यांनी एका तरूण आणि तरूणीला कब्रस्तानमध्ये गप्पा मारत होते म्हणून हटकलं आणि तिथून निघून जाण्यास सांगितलं. त्यानंतर ते दोघंही तिथून निघून गेले. 


मात्र त्यांनंतर काही वेळाने तो तरूण त्याच्या तीन साथिदारांना घेऊन आला. त्या चौघांनी मिळून आझम खान यांना धमकावलं आणि त्यांना मारहाण केली. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.